Menu
Log in
Log in

News Media

  • 1 Nov 2021 9:55 AM | SPMES Mandal (Administrator)

    घर गरिबीने गांजलेले.कमावते हात कमी आणि खाणारे जास्त...अशात मुलगी म्हटले की अनेकांना गळ्याचा फास वाटतो. नेमकी त्यांच्या मनातील हीच भावना बदलून समुपदेशाच्या माध्यमातून किशोरी विकास प्रकल्पाच्या समन्वयक वंदना कसारे यांनी तब्बल पन्नास वालविवाह रोखले. शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर गेलेल्या शेकडो मुलींनाही त्यांनी पुन्हा शिक्षणाची गोडी लावली.


  • 1 Nov 2021 9:49 AM | SPMES Mandal (Administrator)

    ती केंद्रामध्ये सून म्हणून आली. अर्धवट शिक्षण असले तरी तिच्यात काही करण्याची धमक होती. उत्साह होता. जी संधी मिळाली तिने ती आव्हान म्हणून स्वीकारली. आता त्याच सुनेने संशोधन प्रकल्प पूर्ण करून दाखवत केंद्रात नवा उत्साह भरला. वंदना मिलिंद सुरडकर असे तिचे नाव. आज तिच्या यशाने गवसणी घातली असली तरी भुतकाळातली वंदना आठवली की, तिची चिकाटी जिद्द आणि यशाचे दुसरे नाव तेच असावे याची खात्री पटते. गुरुवर्य लहुजी साळवे आरोग्य केंद्राचा प्रारंभीचा काळ होता. मिलिंदनगरमधील घरांशी संपर्क होत होता.


Powered by Wild Apricot Membership Software