Menu
Log in
Log in

Support kshudha Sanman

देवकीनंदन गोपाला क्षुधा सन्मान योजने अंतर्गत औरंगाबाद शहर भुकमुक्त करण्यासाठी सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ आपल्या परीने प्रयत्नरत आहे. सध्या शहरातील 100 निराधार आजी-आजोबांना रोज एक वेळेसचे पोटभर सकस जेवण एका केंद्रामार्फत घरपोच पोंचवले जाते. अश्या 10 केंद्रांसाठी एक शाश्वत रचना ऊभी करून अधिकाधीक गरजू लोकांपर्यंत पोंचण्याची अवश्यकता आहे. औरंगाबाद शहरात असे 1000 आजी-आजोबा आहेत जे आपल्या मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.

एक मध्यवर्ती स्वयंपाक घर उभारून, मोठी वितरण व्यवस्था लावून ह्या 10 केंद्रांतर्गत 1000 आजी–आजोबांपर्यंत पोंचण्याची एक योजना तयार आहे. त्यासाठी काही मदत/निधीही लागणार आहे. आपण अन्नदानाच्या ह्या यज्ञात यथा शक्ति मदत करावी अशी नम्र विनंती आहे.

आपण खालील पैकी कुठल्याही पद्धतीने मदत करू शकता.

  1. वस्तु स्वरुपात (गहू/तांदूळ/दाळ/तेल ई.)
  2. एका केंद्राचा एका दिवसाचा खर्च 5000/- आहे. वर्षातुन एक दिवस देणगी देवून.
  3. आपल्या अप्त स्वकीयांच्या स्मरणार्थ अन्नदान करून. (ती तारीख नक्की करता आली तर उत्तमच)
  4. घरात होण्यार्‍या उत्सवाच्या/शुभ कार्याच्या निमित्याने.
  5. केंद्रीय स्वयंपाकघर उभारण्यात भांडे/वाहन उपलब्ध करून.
  6. शक्य तेवढा वेळ ह्या कार्यासाठी देवून.
  7. अन्य ईतर कुठल्याही स्वरुपात.

संपर्क- श्री पिरजी कमले - 9665735113

Spread the Word

Received:0

0%

Goal:0

Donors

Powered by Wild Apricot Membership Software